
टीम द – लोकार्थ | मुंबई – भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या ४ सप्टेंबर पासून शिव – शक्ती महाराष्ट्र राज्य परिक्रमा दौऱ्यावर आहे.याच दरम्यान आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांची मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट झाली.या भेटीमुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली.ही भेट कौटुंबिक होती,असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.स्नेहभोजन आणि मनमोकळ्या गप्पांसह दोघेही गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या आठवणीने भावूक झाले.
“छत्रपती उदयनराजे माझ्यासाठी माझे मोठे बंधू… आज माझ्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले होते. आमच्यात खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या.. मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक झालो…खरे ऋणानुबंध असेच असतात..” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.