बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकारणातील अनुभवसंपन्न नेतृत्व हरपले !

पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली शोकभावना.
टीम द – लोकार्थ | बीड – सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारे,ऊसतोड मजूर आणि कामगारांसाठी झटणारे व्यक्तित्व म्हणून परिचित असणारे पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र बबनराव ढाकणे यांचे काल निधन झाले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निधनावर ट्विट करत शोकभावना व्यक्त केल्या आहेत.बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकारणातील एक अनुभवसंपन्न नेतृत्व हरवले आहे” अस त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करताना म्हंटल आहे की “माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव जी ढाकणे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक अनुभवसंपन्न नेतृत्व हरपले आहे.ढाकणे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली