“अशोक हिंगे यांच्या प्रचाराच्या दणक्याने
बीड जिल्हात सोनवणे आणि मुंडे कोमात”
बीड | प्रतिनिधी – नुकतेच बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे अशोक हिंगे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी,बीड शहरात रॅली काढून ज्या ठिकाणी महायुती ने सभा घेतली त्याच ठिकाणी अशोक हिंगे पाटलांनी सभा घेऊन एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीची ताकद विरोधक बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांना दाखवून दिलेली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे.याच दरम्यान पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या पेक्षाही जोरदार पद्धतीने अशोक हिंगे पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे.त्यांना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे,दोन प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात खरा शेतकरी पुत्र आणि मराठा समाजासाठी ठिकठिकाणी अंगावर आंदोलने झेलणारा संघर्ष योद्धा अशोक हिंगे पाटील यांच्याशी मराठा समाजासह सर्व समाज पाठीशी उभा राहिलेला असून बीड लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी केलेले आंदोलने तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले सलोख्याचे संबंध तसेच वंचित बहुजन आघाडी ला मदत करा हे केलेले मनोज पाटील यांनी केलेले आव्हान या सर्व अशोक हिंगे पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत.त्यामुळे,आगामी काळात राजकीय वातावरण कोणाच्या बाजूने फिरतेय ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.