
टीम द – लोकार्थ | मुंबई – सध्या राज्यात मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे.मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत.याच पार्श्वभूमीवर,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली दौरा केला होता.
यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ चा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल,असे व्हिडिओचे टायटल आहे.त्यामुळे,राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र,काही वेळानंतर हा व्हिडिओ ट्विटर वरून हटवण्यात आला.या व्हिडिओ पोस्टवर मोठया प्रमाणात नकारात्मक कमेंट्स देखील करण्यात आल्या होत्या.या व्हिडिओची राजकिय वर्तुळात एकच चर्चा होताच तात्काळ हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला.त्यामुळे,राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.हा व्हिडिओ कोणत्या कारणामुळे डिलीट करण्यात आला याचे अद्याप कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाहिये.
राज्य भाजपने आताच हा व्हिडिओ ट्टीट करण्यामागे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत.कारण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते.त्यावेळी,राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत ते काही तरी निर्णय घेण्यासाठी गेले असावे,असे बोलले जात होती.या दोघांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
शेवटी ऐवढेच सांगतो मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईल, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी,नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी,असे फडणवीस यांचे व्हिडिओमध्ये बोल आहेत.फडणवीस हे 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री होते.त्यावेळचे त्यांचे विधानसभेतील हे शेवटचे भाषण होते.