ताज्या बातम्या

गोंधळी, धनगर, बंजारा, भिल्ल समाजासह अठरापगड जातीची मिळतेयं पंकजाताई मुंडेंना साथ

बीडच्या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी दिली एकमुखी पसंती

सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडेच

बीड ।दिनांक ०५।
बीड जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या अभूतपूर्व विकास कामांमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना अनेक सामाजिक घटक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. बीड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरीअर्सच्या बैठकीत याचा प्रत्यय आला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बीड तालुक्यातील गोंधळी समाज,धनगर समाज, बंजारा समाज, भिल्ल समाज आणि लोक कलावंत जिल्हा संघटनेने पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व समाज घटकांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. आगामी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करून त्यांना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला, याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी सर्व समाज घटकांचे आभार मानून पुढील काळात समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असा विश्वास दिला.

बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

भारतीय जनता पक्षाच्या बीड विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख,सुपर वॉरीअर्स आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थितांशी पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला.

लोकसभेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या जिल्ह्याला शोभेल असे मताधिक्य देण्यासाठी संपूर्ण योगदान देऊ आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजूर, सामान्य जनता आणि तरुण बांधव, महिला भगिनींच्या अपेक्षा पूर्ण करणार नेतृत्व दिल्लीत पाठवू असा संकल्प याप्रसंगी कार्यकर्त्यांनी केला.

कार्यकर्त्यांच्या ही संकल्पबद्धता लोकसभेच्या महाविजयाची नांदी ठरणार आहे. आजपर्यंत आपण बीड जिल्ह्याची विकास कामांच्या माध्यमातून मशागत केली आहे, आता मतांची पेरणी करून विजयाचे पीक आपल्याला घ्यायचं आहे. आगामी काळात आपण केलेली विकास कामे प्रत्येक बूथवरील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा आणि आपल्या बूथहुन अधिकाधिक मताधिक्य मिळवून दया अस आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.
••••

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button