ऊध्दव ठाकरे जितेंद्र आव्हाडांपाठोपाठ जरांगे पाटलांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे !
टीम द – लोकार्थ | मुंबई – मराठा,ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे.१ नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथील जाहिर सभेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टिका केली आहे.बीड जाळपोळ प्रकरणी मराठा तरुणांवरील कारवाईचं जरांगे पाटीलांनी खापर धनंजय मुंडेंवर फोडत त्यांना मराठा विरोधी ठरवले आहे.
भुजबळ विरोधाची तोफ थंडावत धनंजय मुंडेविरुद्ध वळवलेली जरांगे पाटलांची तोफ मुंडेंना जड जाणार अशी चर्चा.

तर दुसरीकडे,माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टिका केली आहे.उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेच्या चारित्र्यावर तिरकस टिका करत त्यांना घायाळ केले आहे.पत्रकार परिषदेत बोलताना एका पत्रकराने उध्दव ठाकरेंना “धनंजय मुंडे म्हणतायत की घरात बसून सरकार चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये” या वक्तव्यावरून छेडले असता,उध्दव ठाकरे हे म्हणाले की,”ठीक आहे..त्यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं.धनंजय मुंडेंनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं की हे माझं घर आहे.आणि तिकडं बसून तरी त्यांनी कारभार करावा ही माझी विनंती आहे.”
तसेच,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय यांच्या गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे विरोधी इतिहास ऊकरुन काढला आहे.”जो स्वताच्या राजकिय स्वार्था साठी सख्या काकांचा खड्डा खणत होता …ह्याच काकाचा वारसा हवा होता
त्या काका ला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले आश्रु उभ्या महाराष्ट्रानी बघितले
जो सख्ख्या चुलत बहीणीचा राजकिय छळ करत होता तीला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळी वर जाऊन बोलत होता.स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”
तू आमचा हिशोब विचारणार.हिशोब लावून निष्ठा बदलत नाही मी,ज्यांनी दिला आसरा त्याचे घर जाळत नाही मी.लक्ष्यात आहे ना ….
बात करने से पेहले खुद के गिरेबान मै झाक के देखो आणि हो भगीरत बियाणी नी आत्महत्या का आणि कुणा मुळे केली ?
बोलता तुम्हाला येते तर मुका मी पण नाही.माझ्या मागे काका ची पुण्याई न्हाई
तर गाळलेल्या घामाची ताकत आहे.”,अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर टिका केली आहे.
एकाच दिवशी तिन्ही दिशांकडून झालेल्या हल्ल्यांमुळे धनंजय मुंडें समर्थकांची सोशल मिडीयावर चांगलीच गोची झाली आहे.त्यामुळे,या आरोंपावर धनंजय मुंडे काय उत्तर देणार हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे.