ताज्या बातम्या
धनंजय मुंडेंनी घेतला भाजपच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश! पण असं करायची गरज काय ?? सर्वसामान्यांचा सवाल.
, असं करायची गरजचं काय? सर्व सामान्यांचा सवाल
अंबाजोगाई दि. 29 — पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आता सत्तेत असलेला मित्रपक्ष भाजपचाच कार्यकर्ता फोडून स्वतःच्या पक्षात घेतला आहे, पण हे असं करण्याची गरजचं काय होती? असा सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.
परळी मतदारसंघातील उजनी येथील विद्यार्थी दशेपासून भाजपात असलेले कार्यकर्ते विशाल माने यांनी नुकताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, या प्रवेशाबद्दल धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. उजनी ग्रामपंचायत मध्ये पंकजाताई मुंडे यांचे आठ सदस्य निवडून आले आहेत, ते सर्व भाजपमध्येच आहेत. माने हे एकटेच राष्ट्रवादीत गेले.
खरं तर राज्यात भाजप, शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्तेत सहभागी आहे, असे असताना मित्रपक्ष भाजपचा कार्यकर्ता फोडण्याचे उद्योग पालकमंत्री का करत आहेत? त्यांना असं करण्याची काय गरज आहे? ते स्वतःला असुरक्षित समजत आहेत की काय? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.