
महिनाभरावर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकाच्या बाबत सोलापूर मधील राखीव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी यंदा कुणाच्या गळ्यांत पडणार अशी चर्चा चघळताना सर्वत्र जुने जाणते मंडळी ते तरुण मंडळी दिसत आहेत.
अश्यातच सोलापूर सिदरामेश्वर यात्रेचे मानकरी व पंच असलेले आमदार विजयकुमार देशमुख यांचे पंचमशाली लिंगायत घराणे यांचे ही सोलापूर लोकसभेसाठी “राखीव” मतदारसंघसाठी आल्याचे समजते. खुद्द देशमुखानी “लिंगडर” समाजाचे सर्टिफिकेट असल्याचे अनेक कार्यकर्त्याजवळ बोलल्याने कार्यकर्ते ही उत्साहात दिसत आहेत. परंतु 2019 च्या वेळी देखील “लिंगायत” उमेदवार हवा म्हणून खोटा दाखला असलेल्या “आप्पाजी” ना उमेदवारी देण्यात आली.त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकिर्दीतील कामे पाहता त्यांना उमेदवारी नाही हे नक्की असले तरी पुन्हा “फर्जी” जात पडताळणी प्रमाणपत्र असलेले “यात्रेचे मानकरी देशमुख मालकांना” उमेदवारी म्हणजे अनुसूचित जाती वरती अन्याय नव्हे का ?
एका मिनिटासाठी आपण समजू की देशमुखांना उमेदवारी मिळाली,पण “मालकांना” दिल्ली ला पाठवून उत्तर मध्ये नव्या मालकांचा “उदय” करण्याचा डाव अक्कलकोटच्या “दादांचा” तर नसावा ना अशी ही चर्चा सर्वत्र आहे. ज्या प्रकारे स्वर्गीय लिंगराज वल्याळ साहेब यांनी आमदारकी सोडून दिल्ली ला जाण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागल्याचे दिसून आले व मुलावर पक्ष सोडण्याची वेळ आज मुलावर आली पण मग मालकांच्या आशेच्या “किरण” चे कसे होणार ह्याची ही चर्चा कार्यकर्त्यामध्ये आहे.
ज्या प्रकारे सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर पदाला ज्या प्रकारे भविष्यात अपयश येणारे पद मानले जाते त्याच प्रकारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन पद देखील राजकीय अस्तित्व नाहीसे करणारे आहे.इतिहासात बघायचे झाले तर वि. गु.शिवदारे,दिलीप माने,बाबुराव चाकोते यांचे बाजार समितीचे चेअरमन पदानंतरची स्तिथी आपण पाहूच शकतो.मालकांच्या राजकीय अस्ताची सुरवात लोकसभाच्या उमेदवारी ने दिल्लीत पाठवून तर नव्हे ना! असो येत्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल च परंतु कोण कुणाच्या खेळीपुढे चेकमेट होतोय हे पाहण्यासारखे असेल.