टीम द – लोकार्थ | केज – भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला.श्री.क्षेत्र चाकरवाडीत माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने महापंगतीतील भाविकांना प्रसाद वाटप केला,त्यांच्या या कृतीने उपस्थित भाविक मात्र भारावून गेल्याचे पहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचा सध्या जिल्हाभरात दौरा करत आहेत. आज सोमवती अमावस्यानिमित्त परळीतील व्यापाऱ्यांच्या वतीने चाकरवाडीत महापंगत ठेवण्यात आली होती.पंकजा मुंडे आज बीडमध्ये होत्या, प्रचारातून वेळ काढून त्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पोहोचल्या.
सर्वप्रथम त्यांनी संत माऊली महाराजांचे दर्शन घेतले.मंदिर संस्थानच्या वतीने महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी त्यांचं यावेळी स्वागत केलं.यानंतर लगेच महापंगतीत जाऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी प्रसाद वाटप केला,त्यांचा हा साधेपणा पाहून उपस्थित भाविक भारावून गेल्याचे पहायला मिळाले.