पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडेना नेटकर्यांची पहिली पसंती !

टीम द – लोकार्थ | मुंबई – नारी वंदन अधिनियम कायदा लोकसभेसह राज्यसभेत मोदी सरकारने मंजूर केल्यानंतर द – लोकार्थ ने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक ओपिनियन पोल घेतला होता.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी हा पोल घेण्यात आला होता.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या पत्नी व सामाना मुखपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे,भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि कॉंग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा समावेश होता.
वरीलपैकी,सुप्रिया सुळे यांना ९%,रश्मी ठाकरे यांना ४%,पंकजा मुंडे यांना तब्बल ८५% तर यशोमती ठाकूर यांना ३% लोकांनी पसंती दर्शविली आहे.यामुळे,प्रथम क्रमांकावर पंकजा मुंडे असून दुसऱ्या नंबर वर सुप्रिया सुळे आहेत.पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे यांना जास्त लोकांनी आपली पसंती दर्शविली आहे.
शिव – शक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडे सध्या राजकीय वर्तुळातून गायब असलेल्या पाहायला मिळत आहेत.अमित शहा यांच्या कालच्या मुंबई दौऱ्यात देखील त्या अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत.गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपामध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.आता थेट अजित पवारांचा गट भाजपसोबत आल्यामुळे पंकजा मुंडेंची राजकीय गोची निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी आपण बहिण खा.प्रितम मुंडे यांच्या जागेवरून बीड लोकसभेची निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहिर वक्तव्य केले होते.त्यामुळे,सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या नावाला जरी पसंती मिळाली असली तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणता पक्ष राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करण्यासाठी खरच इच्छुक आहे का ? हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे.