प्रकाश आंबेडकरांनी हिंगेंसाठी दंड थोपटले ; बीड लोकसभेत वंचित प्रस्थापितांना ‘हाबाडा’ देणार ?
बीड – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पाचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे.बीड जिल्हातील राजकारण आणि निवडणुका हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असतो.यंदाची ही निवडणुक याला अपवाद ठरत नाही.बीड लोकसभा मतदारसंघात महायुती कडून पंकजा मुंडे,महाविकास आघाडी कडून बजरंग सोनवणे आणि वंचित कडून अशोक हिंगे पाटील यांच्यासह तब्बल दोन डझन अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
याच दरम्यान,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.सोनवणे आणि मुंडे यांच्या ऐवढा कार्यकर्त्यांच्या व वाहनांचा फौज फाटा नसताना देखील आपल्या मोजक्याच शिलेदारांच्या जीवावर हिंगे यांनी अवघा बीड जिल्हा पिंजून काढला आहे.नुकतेच त्यांनी गेवराई,बीड या तालुक्यात झंझावती दौरा करून ज्यांच्या पर्यंत प्रस्थापित नेते पोहचत नाहीत त्यांच्यापर्यत माझ्यासारखा विस्थापित नेता पोहचतो हे सर्वसामान्य जनतेला थेट कार्यातून दाखवून दिले आहे.
कोणताही राजकीय कलकांचा नसलेला डाग,कोणताही भष्ट्राचाराचा आरोप नाही,मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर केलेले एकत्र काम,तसेच विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनात घेतलेला हिरारीने सहभाग तसेच खुद्द प्रकाश आंबेडकर यांचा असलेला विश्वास या अशोक हिंगे पाटील यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून होत असलेला गावोगावी विरोध तर बजरंग सोनवणे यांची एक मॅनेज उमेदवार अशी तयार झाली असलेली ओळख यांना कंटाळलेला बीड जिल्हातील एक वर्ग अशोक हिंगे यांच्याकडे नविन आशेने पाहत आहे.
येत्या ३ मे ला अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जाहीर सभेतून अशोक हिंगेंसाठी दंड थोपटणार आहेत.नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जाहीर सभा होण्याच्या आधीच प्रकाश आंबेडकर यांची होत असलेली जाहिर सभा बीड मधील भल्या भल्याचे गणित बिघडवून टाकणार असल्याची चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.