Pankaja Munde : पंकजा मुंडे रमल्या ‘आमच्या पप्पाने गणपती आणला’ फेम साईराजसोबत, या निमित्ताने त्यांचं राजकारणालीकडचे नवीन रूप आज पाहायला मिळालं.
राजकारणात आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट सुप्रसिद्ध रील स्टार साईराज केंद्रे आणि गायक माऊली आणि शौर्या घोरपडे यांच्याशी
एका कार्यक्रमा निमित्त झाली.
यावेळी पंकजा ताईंनी आपलं वय विसरून मुलांशी गप्पा मारल्या. साईराजवर त्या इतक्या खूश होत्या की त्यांनी साईराजचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी या चिमुरड्यांसोबत सेल्फीही घेतला. या निमित्ताने पंकजा मुंडे यांचे राजकारणालीकडचे नवीन रूप आज पाहायला मिळालं.
पंकजा मुंडे यांनी नुकतीच आपली शिवशक्ती यात्रा पूर्ण केली आहे. औरंगाबाद येथील संत भगवानबाब मंदिरात दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत पंकजा मुंडे यांची ही परिक्रमा सुरू होती. या काळात त्यांनी पाच हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यावेळी ज्योतिर्लिंग आणि शक्ती पीठांचे त्यांनी दर्शन घेतलं. या परिक्रमा यात्रेत प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं जोरदार स्वागत पाहायला मिळालं.
तेंव्हा पासून राज्यातील राजकारणात पंकजा मुंडे यांचीच सर्वत्र चर्चा पाहण्यास मिळत आहे.
भविष्यात पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे..

