राज्यताज्या बातम्या

मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमी पैलवान विजयला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून मदतीचा हात !

११ ऑगस्ट | पुणे – सातारा जिल्हातील मांडवे ता.खटाव या गावचा कुस्ती क्षेत्रातील एक उदयमुख तरूण पैलवान म्हणुन विजय डोईफोडे याची कुस्तीच्या आखाड्यात ओळख आहे.मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती संकुलात सराव करत आजतागायत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने एक सुवर्ण व दोन रौप्य पदकाची कमाई केली आहे.काही महिन्यांपूर्वी विजय कुस्तीचा सराव करत असताना त्याच्या पायाला दुःखापत झाली होती.पुढे दुखापतीतून लवकर सुटका व्हावी यासाठी त्यांने पुणे येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ठेवले होते.

थोड्याच दिवसात कुस्तीच्या आखाड्यात पुन्हा जोमाने कुस्तीचा सराव सुरू ठेवायचा असा त्याचा मानस होता.मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच लिहून ठेवलं होतं. गेल्या रविवारी हॉस्पिटलला बाईक वरून जात असताना विजयचा स्वारगेट पुणे येथे गंभीर अपघात झाला.या अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि मोठा रक्तस्त्राव झाला.पुणे येथील राव नर्सिंग होम या रूग्णालयात त्याच्यावर अवघड शस्त्रक्रिया देखील पार पडली.यानंतर देखील विजय कोमा अवस्थेत आहे.हॉस्पिटल कडून 25 ते 30 लाख रूपयांचा खर्च सांगण्यात आला आहे.

विजयची घरची परिस्थिती देखील हालाखीची.वडील नोकरीवरून निवृत्त झालेले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरच्या मंडळींनी आयुष्याची जमापुंजी सर्व खर्च केली.तरी देखील पैशांची कमतरता भासत होती.ही गोष्ट विधानपरिषद आ.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या कानावर पोहोचताच त्यांनी तातडीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक मदत पै.विजय डोईफोडे च्या कुटूंबियांकडे काल शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सुपूर्द केली.आम्हाला कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना पंकजाताईंनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल डोईफोडे कुटुंबियांचा उर भरून आला त्यांनी आपल्या वतीने आ.पंकजाताई मुंडे यांचे आभार व्यक्त केले.

पैलवान विजय डोईफोडे यांच्या उपचारासाठी आपण देखील आर्थिक मद्दत खालील बँक खात्यावर जमा करू शकता.

Name – Vijay Jijaba Doiphode
Bank Name – Bank of India
Account no- 131910510004828
IFSC code – BKID0001319

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button