मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे..
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर दोघांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या भेटीत दोघा जणांनी ग्रामस्थांसमोरच चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयो मंत्री सांदिपान भुमरे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आदी उपस्थित होते. शिंदे येथे आल्यानंतर दोघांत चर्चा झाली. त्यानंतर काही वेळात शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांनी सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
