राज ठाकरेंचा राज्य सरकारला जोरदार टोला..
चॅनेल्सचे माईक सुरु असू शकतात,पोटातल ओठांवर आणताना यापुढे विचार करा
टीम लोकार्थ । मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुद्गत देऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य करत ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे उपोषण सोडवताना कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासन दिली गेली नाहीत अशी मी आशा करतो. गेले १७-१८ दिवस महाराष्ट्रात जे घडल ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेले तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या-काठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत.
सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनेल्सचे माईक चालू असू शकतात ह्याच भान येऊन,पोटातल ओठावर ह्यापुढे विचार करेल असा” टोला राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
••••
