लोकसभा लढवण्याचे एकनाथ खडसे यांचे संकेत, रक्षा खडसे म्हणतात…
लोकसभा लढवण्याचे एकनाथ खडसे यांचे संकेत, रक्षा खडसे म्हणतात..
टीम लोकार्थ : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीत रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल मिळेल. जर पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणूक लढवू अस वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केल आहे.
रक्षा खडसे म्हणतात…
एकनाथ खडसे यांच्या लोकसभा लढवण्याच्या भाष्यावर त्यांच्या सून असलेल्या खा. रक्षा खडसे म्हणतात नाथाभाऊंना त्यांच्या पक्षाने आदेश दिला तर ते निवडणूक लढवू इच्छित आहेत.त्यांच्या या वक्तव्यावर मी फारस बोलू इच्छित नाही परंतु मी रावेर मधून भाजपाची खासदार आहे, कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहे, निवडणूक लढवण्यासाठी मी सक्षम असल्याच खा. रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
तर रक्षाताई दोन लाख मतांनी निवडणूक जिंकतील : बावनकुळे
रावेर लोकसभा निवडणुकी संदर्भात सून आणि सासऱ्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केल आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांनी ज्याप्रकारे काम केल आहे ते पाहता त्यांच्या विरोधात कुणीही निवडणूक लढवली तरी रक्षा खडसे या दोन लाख मतांनी निवडून येतील. एकनाथ खडसे यांनी जर रक्षा खडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांचा देखील पराभव होईल असेही ते म्हणाले.
तर रक्षा खडसे या दोन लाख मतांनी निवडून येतील या बावनकुळे यांच्या विधानाने पुढील लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे याच भाजपच्या उमेदवार असतील हे देखील आतां स्पष्ट झाले आहे.
•••••