ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती. समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

लोकार्थ/ मुंबई,नाशिक,दि.२७ सप्टेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. आज मुंबई अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहरातील देखील बारकावे माहिती आहे. गेल्या २५ वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेलं, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. ते मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button