ताज्या बातम्या
“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, महादेव जानकर यांची घोषणा
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत.
अमरावती : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत. माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले, तर मी नक्कीच पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
