खा. प्रितमताई मुंडे यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी, थेट रेल्वे राज्यमंत्री दानवेना केला फोन.
एकमेकांकडे बोट दाखवू नका अधिकाऱ्यांना धरले धारेवर, परळीकडून तात्काळ काम सुरु करण्याच्या दिल्या सूचना
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या प्रगती अहवालाचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी अंमळनेर रेल्वे स्थानकाची ‘स्पॉट पाहणी’ केली.
यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेल्वे विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करताना एकमेकांकडे बोट दाखवून प्रकल्प रखडवू नका अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी प्रकल्पच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक लावण्यासाठी खा. प्रितमताई मुंडे यांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाहणी स्थळावरूनच फोन केला. रेल्वे आणि इतर विभागांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करावा याकरिता हिवाळी अधिवेशना दरम्यान दिल्लीस्थित कार्यालयात बैठक घेण्याचा विश्वास रावसाहेब दानवे यांनी दिला.

