छत्रपती संम्भाजीनगर / विजय देऊळगावकर
मराठा आरक्षणासह जात प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेतील त्रुटी आणि नागरिकांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक होत आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह मराठवाडा विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बैठकीला उपस्थित आहेत. जात प्रमाणपत्र प्रक्रियेतील प्रशासकीय अडचणी, त्रुटी तसेच मराठा समाजाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा बैठकीत घेतला जात आहे. बैठकीत कोणते निर्णय होतात, याकडे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.