सोयगाव तालुक्यातील तिडका शिवारात पाण्याअभावी शेतकऱ्याचा कठोर निर्णय; लाखोंचा खर्च वाया, तीन महिन्यांची मेहनत मातीमोल
लोकार्थ प्रतिनिधी अजय पाटील सोयगाव
दुष्काळाचा केळी बागेला फटका = सोयगांव तालुक्यात तिडका शिवारात तीन तासात शेतकऱ्याने केली चार एकर केळी उध्वस्त
फोटो = तिडका शिवारात केळी पिकांवर ट्रॅक्टर फिरवून बाग उध्वस्त करतांना शेतकरी
सोयगांव ( प्रति. अजय पाटील) – तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा फटका चांगलाच बसला असून शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्या अभावी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येवुन ठेपली आहे. लेकरा सारखा जिव ओतून,लाखो रुपये खर्च करून पिके वाढीस लावली परंतु स्वतःहून पाण्या अभावी पिके उध्वस्त होतांना पाहून शेतकरीवर्ग गहिवरून जात आहे.
सोयगांव तालुक्यातील तिडका, वरठाण, बनोटी, किन्ही, गोदेंगाव
परिसरातील विहिरीनी तळ गाठला असून पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे फळबागा सह पिके जगविण्यासाठी चिंता निर्माण झाली असून पाण्या अभावी फळबागा सुकू लागल्या आहे त्यामुळे पाणीच उपलब्ध नसल्याने तिडका शिवारात शेतकऱ्यांने पाण्याची उपलब्धता नसल्याने चार एकर क्षेत्रावर केळी पिकांवर ट्रॅक्टर फिरवून केळी बागा उध्वस्त केली आहे.
तिडका शिवारात गट क्र-६ मध्ये दिनेश जाधव यांनी खरिपात केळी लागवड चा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविला होता पावसाळ्यात चांगला पाऊस होईल या उद्देशाने त्यांनी खरीप हंगामात जुलै महिन्यात केळी लागवड केली परंतु ऑगस्ट पासुनच पावसाने खंड दिल्याने त्यांनी विहिरीत उपलब्ध पाण्यावर केळी ची वाढ केली मात्र तीन महिने पाणी पुरवून अखेर ओक्टोंबर महिन्यात विहिरीतील पाणी साठा संपल्याने त्यांच्या समोर पर्याय उपलब्ध झाला नाही. सप्टेंबर आणि ओक्टोंबर महिन्यात उन्हाच्या तीव्रतेने केळी बागा सुकू लागल्या होत्या त्यामुळे दिनेश जाधव यांनी चक्क चार एकर केळी बागेवर वर ट्रॅक्टर फिरवून बाग उध्वस्त केली आहे.
प्रतिक्रिया-१) लाखो रुपये खर्च करून तीन महिने तळ हाताच्या फोडा प्रमाणे केळीची बाग जपली परंतु उन्हाची वाढती तीव्रता आणि विहिरीतील तळ गाठलेले पाणी यामुळे पुन्हा पाच महिने केळी बागा जगविणे कठीण झाले होते. त्यामुळे केळी ची बाग उध्वस्त केली.
दिनेश जाधव
शेतकरी तिडका


No Comment! Be the first one.