विजयादशमी उत्सवाचा उत्साह
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत शस्त्रपूजन, विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत सामूहिक शक्ती, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. गुरुगोविंदसिंह नगर (जिल्हा खडकी) येथे गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजता वीर सावरकर मैदानावर सघोष पथसंचलन व विजयादशमी उत्सव होणार आहे. या कार्यक्रमाला फ्रँके फेबर इंडिया प्रा. लि.चे संचालक सुरेश रोटे प्रमुख अतिथी म्हणून, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सहकार्यवाह डॉ. रमेश जाधव वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील विविध भागांत झालेल्या पथसंचलनातून स्वयंसेवकांनी एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेचा संदेश दिला. पारंपरिक गणवेशातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने संघाच्या विविध उपक्रमांना वेग आला आहे.
No Comment! Be the first one.