लोकार्थ प्रतिनिधी कोल्हापूर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धोबीपछाड दिला.
संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक या दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला. गेली पावणेदोन वर्षे अध्यक्ष निवडीपासून महायुतीअंतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तब्बल १३२० दूध संस्था अपात्र करण्याचे उचललेले पाऊल आणि त्यातून महायुतीअंतर्गत उफाळलेल्या संघर्षाचं प्रतिबिंब या निवडणुकीत उमटलं.
No Comment! Be the first one.