लोकार्थ प्रतिनिधी
दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी न्यायालयीन कोठडीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा अन्यायकारक वापर करून आमच्या न्यायालयीन कोठडीत दोन दिवसांची वाढ केली, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जात जे म्हटलं, तेच ग्राह्य मानून दंडाधिकाऱ्यांनी आमची कोठडी वाढवली, असा दास आणि रांका यांचा दावा आहे. अभिजीत दिपके आणि या दोघांना १४ आक्टोबरला अटक करण्यात आली होती. १९ पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्या दिवशी दिपकेंची सुटका झाली, परंतु दास आणि रांका यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली हेती.
No Comment! Be the first one.