लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड दिनांक… राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सरकारने शेतकऱ्या विषयी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास आम्ही सरकारला रस्त्यावर आणू असा देखील इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र मध्ये सध्या कायदा व सुव्यवस्था ही विखुरल्यासारखी झाली आहे उद्योजकांवरती हल्ले कलाकारांवरती हल्ले यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हे निष्क्रिय असल्याचे देखील टीका रोहित पवार यांनी केली आहे मुख्यमंत्री सहा हजार रुपयाची चॉकलेट खातात आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत देतात असे देखील रोहित पवार म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोडो फोडो च्या राजकारणामध्ये जास्त सक्रिय आहेत त्यामुळे त्यांना ग्रहकात सांभाळता येत नाहीये त्यामुळे एखाद्या चांगल्या आमदाराला गृहमंत्री पद किंवा ग्रह खात द्यावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहील असे देखील रोहित पवार म्हणाले.
बाईट… रोहित पवार
राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार
No Comment! Be the first one.