लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरातील राजूर स्टील येथे ट्रॉली पलटी झाल्याने बदनापूर येथील एका २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सतीश सावंत (वय २४, रा. बदनापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सप्तशृंगी कंपनीत स्फोट झाल्याची घटनाही समोर आली आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दोन्ही घटनांबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी माहिती दिली. राजूर स्टील येथील ट्रॉली पलटी झाल्याच्या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून, सप्तशृंगी कंपनीतील स्फोटात जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजूर स्टील येथील दुर्घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याने औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
No Comment! Be the first one.