लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपूर येथे वडील व मुलगा हे रात्री शेतात गेले असताना मध्यरात्री तीन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील ५५ हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहेत.
केज तालुक्यातील अंजनपूर येथील लक्ष्मण तोकले आणि त्यांचा मुलगा विजय तोकले हे दोघे दि. २१ ऑक्टोबर रोजी शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी आणि सून या दोघी घरात असल्याने घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. मध्यरात्री २२ ऑक्टोबर रोजी तीन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून कपाटातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, चांदीचे चैन आणि रोख ५ हजार रु असे एकूण ५५ हजार रु. चे दागीने व पैसे घेवुन गेले.
या घरफोडी प्रकरणी लक्ष्मण तोकले यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु र नं २८४/२०२६ भा न्या सं ३०५, ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण मोरे हे तपास करीत आहेत.
चोरटे चोरी करीत असताना घरातील महिलांनी पाहिले आणि त्या भीतीने मोठ्याने ओरडताच चोरटे पळून गेले. त्यांनी तिघांनीही तोंडाला मास्क लावलेले होते आणि ते तिघेही २० ते २५ वर्ष वयोगटातील होते.
No Comment! Be the first one.