नांदेडमध्ये ४० वर्षीय चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला; कर्जवसुलीसाठी कार्यालयात आणल्याची माहिती, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
खाजगी फायनान्सच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.नांदेड शहरातील हिंगोली गेट चिखलवाडी रोडवरील खाजगी एम एम फायनान्सच्या कार्यालयात हा मृतदेह आढळला. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील 40 वर्षीय चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. खाजगी फायनान्स कडून त्यांनी काही कर्ज घेतले होते. कर्जाच्या वसुलीसाठी शिंदे यांना फायनान्सवाल्यानी गुरुवारी गावातून कार्यालयात नेल्याची माहिती आहे. आज सकाळी कार्यालयात शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करताहेत.
बाईट… नीलम रोहन
पोलीस अधीक्षक नांदेड


No Comment! Be the first one.