महाराष्ट्राचे राजकारण नितीमत्तेवर आधारलेले आहे – रामदास आठवले

टीम द – लोकार्थ | मुंबई – राजकारणाच्या पलिकडे जावुन एकमेकांशी माणुसकीचे नाते जपले पाहिजे. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात बोलल्यापर्यंत विरोध ठीक आहे. राजकीय विरोध व्यक्तीगत पातळीवर ताणला जावु नये. महाराष्ट्राचे राजकारण हे नितीमत्तेवर आधारलेले आहे. त्यामुळे पक्षभेद बाजुला ठेवून एकमेकांच्या सुख दुःखात आपण सहभागी झालो पाहिजे. महाराष्ट्राचे राजकारण नितीमत्तेवर आधारले असल्याने ते निकोप ठेवून त्याचा गौरव वाढवण्यात नेत्यांसोबत पत्रकारांचेही योगदान महत्वाचे आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता गौरव पुरस्कार आज ना. रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि आयोजक आरती पुरंदरे सदावर्ते, भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर, रिपाइंचे संजय भिडे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवशक्ती – भिमशक्ती भाजप एकजुटीसाठी भाऊ तोरसेकरांनी दिले होते मला बळ,
त्यामुळे मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाचे मिळाले मला फळ,
जिंदगीत मी कधीच कोणाची काढत नाही कळ,
भाऊ तोरसेकर म्हणाले मला आता मुंबईतुन दिल्लीकडे पळ
अशी उस्फुर्त कविता सादर करुन रामदास आठवले यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी विपुल लेखन केले आहे. शिवशक्ती – भिमशक्ती भाजप एकजुटी बाबत त्यांनी 49 लेख लिहीले होते.त्यांचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभले.काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने 10 हजार रुपये रोख असणारा महत्वाचा पुरस्कार देवुन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल आरती पुरंदरे आणि आयोजकांचे रामदास आठवले यांनी कौतुक केले.ज्येष्ठ पत्रकार दिवंगत काकासाहेब पुरंदरे यांनी वरळी येथे आचार्य अत्रे यांचा पुतळा उभा करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.महाराष्ट्रात मी मंत्री असतांना काकासाहेब पुरंदरे यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले याची आठवण रामदास आठवले यांनी यावेळी सांगितली.यावेळी कुटुंब रंगले काव्यात या विसुभाऊ बापट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.