अबब…अमित शहांच्या सुरक्षेसाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा.
टीम लोकार्थ ।
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा येत्या शनिवारी (१६) संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. मराठडा मुक्तीसंग्राम लढ्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आयोजित कार्यक्रमात अमित शहा सहभागी होणार आहेत.याच दिवशी राज्य मंत्रीमंडळाची बैठक देखील संभाजीनगर इथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृह विभाग तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करणार आहे.
संभाजीनगर दौऱ्यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविली जाणार आहे.या दौऱ्यादरम्यान गृहमंत्री शहा यांच्या भोवती पंचावन्न एनएसजी कमांडोंच अभेद सुरक्षाकवच असणार आहे. तसेच दहा अतिरिक्त बुलेटप्रूफ सुरक्षा वाहनांचा ताफा,मोबाईल जॅमर वाहने असणार आहेत. अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी दहा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधिकारी देखील असणार आहेत. एकंदरीत अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त संभाजीनगर शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहेत.
अमित शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेची वैशिष्ट्य..
■ 2800 पोलिसांवर असणार सुरक्षा देण्याची जवाबदारी.
■ सहा बॉम्बशोधक पथके तैनात केली जाणार
■ बुलेटप्रूफ वाहनांच्या ताफ्यात दहा अतिरिक्त वाहने, मोबाईल जॅमर
■ 10 पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधिकारी
■ अमित शहा यांच्याभोवती 55 एनएसजी कमांडो असणार तैनात
■160 पोलीस निरीक्षक आणि 400 सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरक्षेसाठी तैनात
■ झेड प्लस सुरक्षा व्यवस्था
■अन्य जिल्ह्यांतून अतिरिक्त कुमक मागवण्यात येणार
■500 राज्य राखीव पोलिसांच्या चार तुकड्या तैनात करण्यात येणार.
••••
