लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
जैतखेडा येथे नवरात्राच्या सातव्या माळेनिमित्त शेकडो वर्षांपासून चालत आलेली चक्री पूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली.
महिलांनी रांगोळी काढून त्यावर सप्तधान्य, ९ कलश आणि दिव्यांची मांडणी केली. पूजा, अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
चक्र म्हणजे देवीचे असुरांशी झालेले युध्द. ही पूजा केली जाते. ११ प्रकारचे तांदळाचे गोल काढून बनवून ही पूजा केली जाते. यावेळी देवी मातेचाचा गजर करण्यात येतो.
या पूजेमुळे गावात सुख-शांती नांदते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.यापुजेला महिला मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.