जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक घेतला विधीत सहभाग
लोकार्थ प्रतिनिधी सुजित शिंदे धाराशिव
दुर्गाष्टमीच्या पावन पर्वानिमित्त श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा आणि महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा भक्तिभावात संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी ६ वाजता वैदिक होम-हवन विधीस प्रारंभ झाला.
याप्रसंगी धाराशिवचे मा. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक वैदिक होम-हवन विधीत सहभाग घेतला. दुर्गाष्टमीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक विधींना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
No Comment! Be the first one.