तुमच्या ऐकण्यात असलेल्या सदावर्ते ला सांगून केस मागे घ्यायला सांगा !

मराठा आरक्षण आंदोलकांचा राज्य सरकार विरुद्ध सोशल मिडीयावर आक्रोश.
टीम द लोकार्थ | मराठवाडा – जालना येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर येत आहे.गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्हातील सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते.बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम होते.
आंदोलन हे चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.यास आंदोलकांनी विरोध केला.त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली अन् पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.तसेच,सोशल मीडियावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.