दोघा विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज:- भावा सोबत बैलगाडीतून जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या भावाला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून दोघा बहीण-भावाला मारहाण करून विनयभंग केला आहे.
दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील म्हसोबाच्या मंदिरा जवळ, कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली महाविद्यालयीन तरुणी ही तिच्या भावा सोबत उसाच्या फडातून जनावरांना बैल गाडीतून ऊसाचे वाडे घेऊन येत असताना, त्यांना एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आडवी उभी करून अडविले.
त्या तरुणीच्या भावाने त्यांना गाडी बाजूला घ्या असे म्हणताच स्वप्निल आंधळे याने त्या तरुणी जवळ जाऊन वाईट हेतूने तिच्या हाताला धरून खाली ओढले आणि स्त्री जातीला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे तिच्या अंगाशी झोंबा झोंबी केली. तसेच स्वप्निल तिला म्हणाला की, “आपण पळुन जावुन लग्न करायचे आहे. तु माझे सोबत लग्न करणार आहेस का नाही ?”
तसेच स्वप्निल छत्रभुज आंधळे, गोट्या छत्रभुज आंधळे आणि गोपाळ बाजीराव आंधळे या तिघांनी त्या दोघा बहीण-भावाला उसाच्या वाड्याने मारहाण केली.
मारहाणी नंतर तरुणीच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात स्वप्निल छत्रभुज आंधळे, गोट्या छत्रभुज आंधळे आणि गोपाळ बाजीराव आंधळे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ६७३/२०२३, भा. न्या. सं. ७४, ११५(२), ११८, १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे तपास करीत आहेत.
एक महिन्या पासून देत होता तिला त्रास :- त्या तरुणीचे लग्न जमलेले असून लग्न जमल्याचे माहीत झाल्या पासून सुमारे एक महिन्या पासून स्वप्निल आंधळे हा तिला वारंवार फोन करून त्रास देत आहे.
No Comment! Be the first one.