ग्रामस्थांनी घेतलं एकमुखी ठराव
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – दिनांक एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण होणार असून त्या पार्श्वभूमी वरती पावडेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी आज असा ठराव घेतला आहे की आम्ही ग्रामपंचायत ची जागा दवाखान्यासाठी ठराव घेऊन दिल्यानंतर स्थानिक आमदार हे गावकऱ्यांना विश्वासात न घेता हे कार्यक्रम करत आहेत त्यामुळे गावकऱ्यांनी आमदारांवरती नाराजी व्यक्त करत असा ठराव घेतला आहे की या दवाखान्यामध्ये पावडेवाडी गावातील लोकांना 25% समाविष्ट करावे यावेळी गावकऱ्यांनी दवाखाना केल्याबद्दल आमदार बालाजी कल्याणकर यांचे आभार देखील मानले आहेत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या कार्यक्रमावरती पावडेवाडीकरांनी बहिष्कार टाकण्याचा आव्हान देखील केले आहे.
No Comment! Be the first one.