लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड (म नेता)
तालुक्यातील वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनावरुन मोठा वाद निर्माण झाला असून आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून वाडी बु येथील ग्रामस्थांचा अवमान केला म्हणून सर्व पावडे बंधु एकत्र आले आहेत. दरम्यान सदरील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी भरती करताना २५ टक्के स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून वाडी बु येथील आजी माजी पदाधिकारी व गावकरी यांना डावलण्यात आल्याने मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील वाडी बु येथे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयाचे १ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी गावकरी मंडळी यांना विश्वासात घेतले नाही म्हणून मोठा गोंधळा निर्माण झाला आहे. वाडी बु येथील गावकरी मंडळी संतप्त झाले आहेत. वाडी बु येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी एकत्र येत ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या ग्रामसभेत गावातील तरुणांनी एकत्र येत आमची लाख मोलाची जमीन उपजिल्हा रुग्णालयास दिली असून या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी भरती करताना वाडी येथील स्थानिक रहिवासी असलेल्या बेरोजगार तरुणांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच या गावातील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांना मानाचे स्थान देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच सदर ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे नाव कोनशिलेवर नाव घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. वाडी बु येथील ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या ग्रामसभेला काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे, अध्यक्ष विठ्ठल पावडे, माजी सभापती बंडू पावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बंडू पावडे, हरीभाऊ पावडे यांच्या सह सर्व पावडे बंधु एकत्र आले आहेत. आमदार बालाजी कल्याणकर यांनी वाडी बु येथील ग्रामस्थांच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
पावडे बंधु एकवटले
वाडी बु येथील ग्रामस्थ व गावातील बेरोजगार एकवटले आहेत. आमदार बालाजी कल्याणकर यांना विरोध करण्यासाठी सरसावले आहेत. वाडी बु येथील बेरोजगार तरुण व गावातील आजी माजी पदाधिकारी कल्याणकर यांच्या एककल्ली कारभाराच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. आमदार बालाजी कल्याणकर व पावडे बंधु आगामी निवडणूका लक्षात घेऊन एकत्र येत कल्याणकर यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
No Comment! Be the first one.