लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : सेनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवून जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, फळबाग उत्पादकांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कथित मतचोरीच्या आरोपांप्रकरणी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, जंगलतोड थांबविणे आणि मायक्रोफायनान्स कंपन्या, खासगी सावकार व बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली बंद करण्याची मागणीही करण्यात आली.
या मोर्चात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ, किसान काँग्रेस अध्यक्ष एकनाथ शिंदे, शामराव जगताप, सेनगाव तालुकाध्यक्ष डॉ. नीलकंठ गडदे, पंजाबराव हराळ प्रभू आप्पा जिरवणकर, गजाननराव देशमुख, विनायकराव देशमुख, रामेश्वर हेंद्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
No Comment! Be the first one.