अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात जमिनीच्या वादातून धक्कादायक आणि थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका घरावर बोलेरो पिकअप वाहन वारंवार चढवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेत घरात असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन घरावर तब्बल चार ते पाच वेळा चढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जमिनीच्या वादाचे पर्यवसान इतक्या टोकाच्या हिंसक प्रकारात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणाची तीव्रता अधिक स्पष्ट होत आहे.
No Comment! Be the first one.