मांजरा धरण ते हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान प्रशासनाची कारवाई; महिनाभरातील तिसरी मोठी मोहीम
लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत पाणीउपसा रोखण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केली आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २८ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे पाइपही जप्त करण्यात आले.
मांजरा धरण ते हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्र या मार्गावरील जलवाहिनीवर ही कारवाई करण्यात आली. तांदूळजा, रांजणी, घारगाव, ताडगाव आणि हिंगणगाव परिसरात अनधिकृत जोडण्या आढळल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार महसूल, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने ही मोहीम राबवली.
No Comment! Be the first one.