विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : विविध मागण्यांसाठी पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी शुक्रवारी समाजकल्याण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, आर्टी, वनार्टी व अमृत अंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, फेलोशिपमधील HRA व आनुषंगिक निधीची कपात रद्द करावी, ३५ वर्षांची वयोमर्यादा शिथिल करावी आणि २०२६ मधील पीएच.डी. विद्यार्थ्यांना तातडीने फेलोशिप प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. जोरदार पावसातही दुपारी आंदोलन सुरूच होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
No Comment! Be the first one.