लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल
जवळा बाजार – हिंगोली
शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळा, जवळा बाजार येथील विज्ञान शिक्षक श्री. नागेश अरुणराव वाईकर सर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राबवत असलेल्या ‘शंभर दिवस, शंभर विज्ञान प्रयोग’* या नाविन्यपूर्ण उपक्रमावर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) ‘शिक्षणगाथा’ त्रैमासिकाच्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ या अंकात लेख प्रसिद्ध झाला आहे.
‘कृती करा,शोधा आणि शिका या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याच्या मदतीने विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांतून समजून घेण्याची संधी मिळत आहे.
प्रयोगातून निरीक्षण, प्रश्न विचारणे, तर्क करणे, निष्कर्ष काढणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, अशा अनेक कौशल्यांची रुजवण या उपक्रमातून होत आहे.
विज्ञान केवळ पाठ्यपुस्तकात नसते, तर ते आपल्या सभोवतालच्या जगात दडलेले असते, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणाऱ्या या उपक्रमाची राज्यस्तरीय शैक्षणिक नियतकालिकात दखल घेतली जाणे ही संपूर्ण शाळेसाठी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
श्री. नागेश अरुणराव वाईकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या यशामागे असलेल्या आपल्या कल्पकतेचे, सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि विद्यार्थिकेंद्रित अध्यापनाच्या ध्यासाचे मनापासून कौतुक!
तसेच या उपक्रमाला प्रोत्साहन देणारे , श्री नानासाहेब कदम साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी , सन्माननीय मंत्री महोदयइतर मागास बहुजन कल्याण विभाग , प्रादेशिक उपसंचालक लातूर डॉक्टर तेजस माळवतकर साहेब, श्री धर्माधिकारी साहेब सहाय्यक आयुक्त हिंगोली, शाळेचे मुख्याध्यापक श्री बळवंतराव चव्हाण सर, संस्थेचे अध्यक्ष श्री संजय परिहार सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री कैलास लाहोटी सर, सहकारी शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले आहे.
या उपक्रमातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळो आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड अधिकाधिक वाढो, हीच सदिच्छा!
No Comment! Be the first one.