जालन्यातील पत्रकार परिषदेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी पगारी मिळणार; बोर्डीकर यांची ग्वाही…
दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आज जालना दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार जनतेच्या पाठीशी आहे, असं मेघना बोर्डीकर यावेळी म्हणाल्या. तसेच राज्यात sufficient ऊर्जा आहे, सगळ्यांना आपण ऊर्जा पुरवू शकू, अशी माहितीही बोर्डीकर यांनी दिली. दरम्यान, लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी पगारी मिळणार, अशी ग्वाहीही बोर्डीकर यांनी यावेळी बोलतांना दिलीय.
मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र
No Comment! Be the first one.