लोकार्थ प्रतिनिधी गुणीरत्न वाकोडे
जिंतूर: शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजया दशमी निमित्त बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पंचरंगी व निळ्या दुधाचे ध्वजारोहण पू.भंते संघरत्न यांच्या हस्ते करण्यात आले.
पू.भंते संघरत्न यांनी उपस्थित बुद्ध उपासक उपासिकांना बुद्ध वंदना पंचशील त्रिशरण व धम्मदेशना दिली.
या धम्मचक्र परिवर्तन दिन पी. एस. सावंत,संभाजी खिल्लारे व प्रधान सर यांनी उपस्थितीना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत धम्मचक्र दिनाचे महत्त्व सांगून त्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे,नगरसेवक अशोक बंड,माजी नगरसेवक चंद्रकांत बहिरट,बंटी निकाळजे, ॲड.बाबासाहेब घनसावध,लखन खिल्लारे प्रकाश,नवसागर, विकास अण्णा मोरे,अशोक वाकळे,जयश्री देबाजे आशाताई खिल्लारे सह बहुसंख उपासिका महिलांची उपस्थिती होती.


No Comment! Be the first one.