लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद: येथील पोलीस ठाण्यात विजयादशमी दसऱ्यानिमित्त पोलीस ठाण्यातील शस्त्रांचे पूजन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. समाजात सुख, आनंद, शांतता राहण्यासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी दसऱ्यानिमित्त होणारे परंपरागत पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी खुलताबाद पोलीस ठाण्यात वाईट वृत्तींचा बिमोड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांची विधिवत पूजा करण्यात आली.
घरादाराचा विचार न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सणासुदीला घरच्यांसोबत सण साजरा करण्यासाठी उपस्थित राहता येत नाही त्यामुळे विविध क्षणांचा आनंद पोलिसांनी घेता यावा यासाठी विविध उपक्रम पोलीस दलात केले जातात दसऱ्याला होणाऱ्या शस्त्र पूजनाचा सोहळा देखील याचाच एक भाग आहे यानिमित्त खुलताबाद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यातील शस्त्रांची विधिवत पूजन केले.
पूर्वीच्या काळी पोलीस प्रामुख्याने लाठ्या किंवा साध्या बंदुकांचे पूजन केले जात असत. परंतु आधुनिक काळात सुरक्षेची आव्हाने लक्षात घेता आता पोलीस दलातील अद्यावत शस्त्रांचे जसे रायफल्स, अत्याधुनिक पिस्तूल या शस्त्रांची आकर्षक मांडणी करून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते मुख्य पूजा संपन्न झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, विशाल बोडके, पोलीस हवालदार जाकीर शेख, जाबीर शेख, भारत ठोंबरे, कारभारी गवळी, नवनाथ कोल्हे, आनंद आरसडे, प्रमोद साळवी, सतीश गोडले, महिला पोलीस हवालदार सोनाली कुंदे, जयश्री बागुल, अशोक सोनवणे, फिरोज शेख, नितीन ढवळे आदी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.