गायत्री नगरच्या युवकांचे महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांना निवेदन
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील मोतीबाग जलकुंड येथे दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गायत्री नगर येथील युवकांनी जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंडळांच्या वतीने दुर्गामातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर या मूर्तींचे विसर्जन मोतीबाग जलकुंड येथे करण्यात आले. या विसर्जनादरम्यान दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा आरोप गायत्री नगर येथील युवकांनी केला आहे.
या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित घटनेची सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवकांनी केली आहे.
मोतीबाग जलकुंडावर घडलेल्या या प्रकाराची सत्यता तपासून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.