छत्रपती संभाजीनगर : लोकार्थ प्रतिनिधी
मराठवाड्यात पाऊस ५५ टक्के कमी झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा न करता हेक्टरी १ लाख रुपयांची ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांशी संवाद साधण्यासाठी पवार शहरात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले, तेव्हाही सरकारनं योग्य मदत केली नाही. यंदा दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. अशा कठीण प्रसंगी सरकारनं ५ हजार रुपयांची तोकडी मदत जाहीर करून गरिबांची आणि शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

No Comment! Be the first one.