नळाला तोटी बसवण्याचे आवाहन; पाणीचोरी रोखण्यासाठी १८ पथकांची स्थापना
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे
लातूर शहरात पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असताना पाण्याचा अपव्यय आणि अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मांजरा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर करण्यात आले आहे.
महापालिकेने प्रत्येक नळाला तोटी बसवण्याचे आवाहन केले असून, त्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिल्याचे वृत्त आहे. तोटी न बसवणे किंवा पाणी वाया घालवणे यांसारख्या प्रकारांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेने १८ स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. अनधिकृत नळजोडण्या शोधणे, पाणीपुरवठ्यासाठी मोटारपंपांचा अनधिकृत वापर रोखणे आणि जलवाहिन्यांमधील गळती थांबवणे, अशी कामे या पथकांमार्फत केली जाणार आहेत.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर नागरिकांचीही आहे. त्यामुळे पाणी साठवताना गळती होणार नाही याची काळजी घेणे, आवश्यक तेवढेच पाणी वापरणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.
No Comment! Be the first one.