लोकार्थ प्रतिनिधी सातारा
जिल्हा बँक निवडणूक: खा. उदयनराजे भोसले व खा. नितीन पाटील यांची माघार; काका धुमाळ यांची बिनविरोध निवड
सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या असून, ‘दहा वर्षांच्या निकषा’ मुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या नियमाच्या पार्श्वभूमीवर खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचसोबत खासदार नितीन पाटील यांनीही या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
दिग्गजांच्या या माघारीमुळे काका धुमाळ यांचा जिल्हा बँकेत बिनविरोध प्रवेश झाला असून त्यांची बँकेचे नवे संचालक म्हणून निवड झाली आहे.
दुसरीकडे, बँका व नागरी पतसंस्था मतदारसंघातून आमदार मनोज घोरपडे आणि विद्यमान नगरसेवक अविनाश कदम यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
निवडणुकीतील दहा वर्षांच्या नियमाने एन वेळेस संपूर्ण राजकीय चक्रे फिरवली असून अनेक प्रमुख नेत्यांना शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर काका धुमाळ यांची बिनविरोध निवड ही जिल्हा बँकेच्या वर्तुळातील अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड ठरली आहे.
No Comment! Be the first one.