लोकार्थ प्रतिनिधी रविंद्र जोशी
परळी वैजनाथ – विधानपरिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निबडणुकीसाठी आज (दि.२३) मतदान प्रक्रिया झाली. या अनुषंगाने परळीच्या उच्चविद्याविभुषित नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पदवीधर मतदारसंघातील निबडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुर झाली. पदवीधरांच्या हक्काचा मतदार संघ म्हणून राज्याच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व देणाऱ्या या मतदारसंघाचे विशेष महत्त्व आहे या निवडणुकीसाठी परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी जि.प. कन्या शाळा मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनीही पदवीधर मतदारसंघासाठी आपले मतदान केले. सक्षम व सुदृढ लोकशाही मधील महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान असतो. पदवीधरांच्या न्याय हक्कासाठीचा स्वतंत्र मतदारसंघ असलेल्या पदवीधर मतदार संघात आपला हक्काचा प्रतिनिधी पाठवण्याचा ही वेळ असते. मतदानाचा हा सर्वोच्च नागरी हक्क बजावताना आनंद व अभिमान असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी मतदानानंतर दिली.
No Comment! Be the first one.