लोकार्थ प्रतिनिधी
काल मी ऐकवलेली क्लिप 2024 ची आहे, हे रामदास कदम यांना कसे समजले, असा सवाल शुक्रवारी मनोज जरांगे यांनी केला. ही क्लिप एआयच्या मदतीने तयार केली, असा दावा करणाऱ्यांनाही जरांगे यांनी फटकारले. ते म्हणाले, एआयचे प्रस्थ आज वाढले आहे, 2024 मध्ये ते इतके वापरत नव्हते. तसेच ही क्लिप एक ऑनलाईन मिटिंगची आहे. एआय क्लिप तयार करण्यासाठी कोणाचे आवाज तरी माहिती पाहिजेत. क्लिपमध्ये कोण बोलतात त्यांची नावेसुद्धा आम्हाला माहीत नाहीत. त्यामुळे एआयचा क्लिपशी संबंध नाही. क्लिपमध्ये जे बोलत आहेत, त्यांचा शोध घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
No Comment! Be the first one.